- | ग्राम पंचायत म्हैसपूर अधिकृत संकेतस्थाळावर आपले स्वागत आहे. आपले सूचना व अभिप्राय "संपर्क" या पानावर जाऊन कळवावे. धन्यवाद |
- | संविधान दिनानिमित्त ग्रामपंचायत म्हैसपुर येथे जिल्हा परिषद शाळेतील 51विद्यार्थ्यांना भारताच्या संविधानाची उद्देशिकाची वाटप करण्यात आले व शाळेत रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते |
ग्रामपंचायत म्हैसपूर अधिकृत संकेतस्थळावर आपले स्वागत आहे.
ग्रामपंचायत म्हैसपुर हे गाव अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील अमरावती ते दर्यापूर रोडवर व अमरावती वरून २७ किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. तालुक्याचे ठिकाण असलेले भातकुली गावा पासून १५ किलोमीटर अंतरावर आहे गावाच्या बाजूला ५ किलोमीटर अंतरावर असलेले खोलापूर गाव येथे गावाची बाजारपेठ, बँक तसेच कॉलेज आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया ची मिनी बँक तसेच CS सेंटर म्हैसपूर येथे आहे महत्त्वाचे म्हणजे म्हैसपूर गावा पासून ३० किलोमीटर अंतरावर अमरावती विमानतळ(Airport ) व बडनेरा जंक्शन सुद्धा आहे. अमरावती रेल्वे स्टेशन सुद्धा फक्त २५ किलोमीटर अंतरावर आहे.
म्हैसपूर हे गाव श्री संत झिंग्राजी महाराज यांच्या पावन स्पर्शाने पावन झालेले आहे गावामध्ये सर्व धर्म समभावाचे वातावरण आहे . गावामध्ये बौद्ध विहार, हनुमान मंदिर, श्री संत झिंग्राजी महाराज मंदिर, संत गजानन महाराज मंदिर, श्रीकृष्ण मंदिर आहे.
म्हैसपूर गावाची लोकसंख्या 1100 असून गावामध्ये बहुतेक कुटुंब हे शेतकरी आहे. शेतामध्ये प्रामुख्याने सोयाबीन, तूर, कापूस, चना हे पारंपारिक पिके घेतली जातात. शेतामध्ये सिंचनासाठी विहिरीचा वापर केला जातो. म्हैसपूर हे गाव खारपट्ट्यातील असल्याने बारमाही बागायत येथे घेऊ शकत नाही परंतु पिकाला एक दोन पाणी देऊन उत्पन्न वाढवण्यासाठी याचा वापर केला जातो.
म्हैसपूर गावामध्ये जिल्हा परिषदेची वर्ग १ ते ७ पर्यंत शाळा असून वर्ग ८ ते १० साठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालय आहे. गावामध्ये दोन ओपन जिम असून एक सुसज्ज अशी क्रीडा विभागामार्फत मिळालेली व्यायाम शाळा आहे. गावामध्ये ग्रामपंचायत भवन, तलाठी कार्यालय व निवास, सार्वजनिक वाचनालय, समाज मंदिर, पोस्ट ऑफिस अशी कार्यालय आहेत. म्हैसपूर गावामध्ये सुसज्ज अशी स्मशानभूमी आहे. स्मशानभूमीला पोच रस्ता, वॉल कंपाऊंड, गेट, वृक्ष लागवडीने सुसज्ज अशी स्मशानभूमी आहे. म्हैसपूर गावामध्ये अंगणवाडी सुद्धा आहे.
म्हैसपुर गावाला अनेक पुरस्कार प्राप्त असून त्यामध्ये तंटामुक्त ग्राम पुरस्कार ,आर आर आबा स्मार्ट ग्राम, आदर्श ग्राम पुरस्कार प्राप्त आहे म्हैसपूर गावामध्ये एक गाव एक उत्सव याप्रमाणे उत्सव साजरे केले जातात. संपूर्ण गाव मिळून सार्वजनिक गणपती उत्सव, सार्वजनिक दुर्गादेवी उत्सव, सार्वजनिक अखंड हरिनाम सप्ताह, सार्वजनिक श्री संत झिंग्राजी महाराज पुण्यतिथी, सार्वजनिक गजानन महाराज प्रकट दिवस, सार्वजनिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व पुण्यतिथी अशा प्रकारचे सर्व उत्सव एक गाव एक उत्सव या प्रकारे साजरे केले जातात.
म्हैसपूर गावामध्ये बस स्टॅन्ड पासून येणार मुख्यपोच रस्ता सिमेंट काँक्रीटने सुसज्ज बनविला असून रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड केलेली आहे. गावातील सर्व अंतर्गत रस्ते हे सिमेंट काँक्रीटचे झालेले असून सर्व सार्वजनिक गटारे हे बंदिस्त केले आहेत. संपूर्ण गाव हे शौचालयाचा वापर करत असून सेप्टिक टॅंक, सार्वजनिक स्वच्छतालय उपलब्ध आहे.
म्हैसपूर गावामध्ये सार्वजनिक ठिकाणी सौर उर्जेवर चालणारे स्ट्रीट लाईट चा वापर केला जातो. संपूर्ण गावांमध्ये चौका चौकात बैठक व्यवस्था करण्यात आली आहे तसेच संपूर्ण गावात प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे शुद्ध पाणीपुरवठा केला जातो. गावामध्ये गुरांसाठी सुद्धा पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था केलेली आहे. गावामध्ये दोन हॅन्ड पंप सुद्धा बसवलेले आहे
गावामध्ये गेल्या तीन वर्षांमध्ये जवळपास दहा कोटी रुपयांची विकास कामे झालेली असून प्रत्येक कुटुंबाला कचरापेटी देण्यात आली आहे व गावामध्ये सार्वजनिक ठिकाणी सुद्धा कचरापेटी लावण्यात आली आहे. गावामध्ये घंटागाडी सुद्धा आहे. म्हैसपूर गावामध्ये संपूर्ण गाव सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी जोडले जोडणे प्रस्तावित आहे. लवकरच हे काम पूर्ण होणार आहे. संपूर्ण गावांमध्ये वृक्ष लागवड ग्रामपंचायतीमार्फत लोकसहभागातून करण्यात आली आहे.
निळकंठ नथुजी ढोक (पाटील )
सरपंच म्हैसपूर
श्री वसंतराव शामरावजी ढोके
उपसरपंच म्हैसपूर
श्री युवराज अशोकराव जाधव
ग्रामपंचायत अधिकारी
गावातील प्रमुख कार्यक्रम आणि छायाचित्रे













