दिनांक 25 नोंहोबर रोजी ग्रामपंचायत मैसपुर येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत आपल्या पंचायत समितीचे विद्यमान गटविकास अधिकारी यांचे प्रमुख उपस्थिती मध्ये खालील प्रमाणे कार्यक्रम घेण्यात आले.
1) गावातील सर्व नागरिका साठी मोफत आरोग्य तपासणी करून त्यावर उपचार करणे
2) पंचायत निर्णय aap, मेरी पंचायत aap, व ग्राम संवाद aap सर्व नागरिकाचे मोबाईल मध्ये डाउनलोड करून त्या द्वारे ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शक पद्धतीने कसा चालतो हे बघण्यासाठी नाविन्य पूर्ण असा उपक्रम राबविण्यात आला.
3) Q R code द्वारा 1 दिवसात 100000/- ( 1 लक्ष रुपये ची विक्रमी वसुली करण्यात आली.
4) लोकसहभा मधून गावालगतच्या नदीवर वनराई बंधारा निर्माण करण्यात आला.
5) जी. प.शाळेतील विद्यार्थी, शिक्षक,गावातील महिला व सर्व नागरिक यांचे उपस्थितीत गावातून प्रभात फेरी काढून या अभियानाची जनजागृती करण्यात आली.
6) ग्रामपंचायती मार्फत लावण्यात आलेल्या डिजिटल बोर्ड चे मा. तुषार दांडगे गटविकास अधिकारी पंचायत समिती भातकुली यांचे हस्ते अनावरण करण्यात आले.
7) प्रधानमंत्री आवास प्लस अंतर्गत उदिष्ट नुसार घरकुल बांधकामाची पाहणी करण्यात आली.व सर्व घरकुले १०० टक्के पूर्ण करण्यात आले असून सर्व हप्ते व नरेगा मधून मिळणारे मजुरीची १०० टक्के रक्कम अदा करण्यात आलेली आहे.
8) गावातील बंदिस्त नाली बांधकाम,उत्कृष्ट रस्ते,पिण्याचे पाण्याचे सोर्स,स्मशान भूमी मधील करण्यात आलेली रुक्ष लागवड,ओपन जिम,सांडपाण्याचे नियोजन इत्यादी सर्व उपक्रमांना मा.तुषार दांडगे गटविकास अधिकारी स्वतः पाहणी करून मार्गदर्शन केले.
त्यावेळी सोबत प्रल्हाद तेलंग विस्तार अधिकारी पंचायत,सुनील ठाकरे कनिष्ठ अभियंता बांधकाम ,हे हजर होते.
या सर्व कार्यक्रमांचे श्रेय मा.नीलकंठ राव ढोके सरपंच,
व कर्तव्यदक्ष ग्रामपंचायत अधिकारी श्री.युवराज जाधव यांना जाते.
या सर्व आयोजित उपक्रमाचे समन्वयक,मार्गदर्शक श्री शिवानंद भाऊ ( पाटील) असून गावातील नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत आहे.















